आमच्या प्रमुख योजना
व्याजदर व अटींच्या अद्ययावत माहितीसाठी कृपया संस्थेच्या कार्यालयाशी संपर्क साधा.
बचत ठेव खाते
दैनंदिन व्यवहार व छोट्या बचतीसाठी सोपे खाते. केव्हाही रक्कम भरणे व काढणे शक्य.
मुदत ठेव (FD)
ठराविक मुदतीसाठी ठेव ठेवा आणि खात्रीशीर परतावा मिळवा. मुदतीनुसार व्याजदर.
आवर्त ठेव (RD)
दरमहा ठराविक रक्कम जमा करून भविष्यासाठी नियोजनपूर्वक बचत करा.
दैनंदिन ठेव (पिग्मी)
रोज थोडी-थोडी रक्कम जमा करण्याची सोय – छोट्या व्यावसायिक महिलांसाठी उपयुक्त.
व्यवसाय / गृहउद्योग कर्ज
शिवणकाम, किराणा, दुग्धव्यवसाय, शेतीपूरक व्यवसाय यांसाठी भांडवल.
वैयक्तिक कर्ज
शिक्षण, आरोग्य, लग्नकार्य किंवा घरगुती गरजांसाठी सुलभ कर्जसुविधा.
विश्वास, सुरक्षितता आणि आपुलकी
सुरक्षित ठेवी
सहकार कायद्यानुसार नोंदणीकृत संस्था – पारदर्शक व्यवहार.
महिला नेतृत्व
संपूर्ण संचालक मंडळ महिलांचे – महिलांच्या गरजा समजून घेणारी संस्था.
सोपी प्रक्रिया
कमी कागदपत्रे, मराठीतून मार्गदर्शन आणि जलद सेवा.
सभासद होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- पासपोर्ट साइज फोटो (२)
- रहिवासी पुरावा (रेशन कार्ड / लाईट बिल)
- भागभांडवल व प्रवेश शुल्क
* कर्ज योजनेसाठी आवश्यक अतिरिक्त कागदपत्रांची माहिती कार्यालयात मिळेल.
योजनेची माहिती हवी आहे?
कार्यालयीन वेळेत कॉल करा किंवा WhatsApp वर संदेश पाठवा.