नोंदणी क्र. डी.एल.ई/एस.के.आय/आर.एस.आर/(सी.आर)१०२६/२०१४ · दि. १४/०७/२०१४ 📞 ९०२११ ५४८१४  |  ✉ savitribaifulemahilapath@gmail.com
पतसंस्था लोगो क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेमहिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या.
जैताणे, ता. साक्री, जि. धुळे
मुख्यपृष्ठ › आमच्याविषयी

आमच्याविषयी

बचत – स्वावलंबन – विकास हे ब्रीद घेऊन कार्य करणारी महिलांची पतसंस्था

संस्थेची ओळख

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या.

जैताणे (ता. साक्री, जि. धुळे) येथे ग्रामीण भागातील महिलांना बचतीची सवय लागावी, त्यांना सुलभ कर्जपुरवठा व्हावा आणि त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हाव्यात, या उद्देशाने संस्थेची स्थापना करण्यात आली.

संस्थेचे संपूर्ण कामकाज महिला संचालक मंडळाच्या माध्यमातून चालते. "सुरक्षितता, विश्वास हाच आमचा ध्यास!" हे ब्रीद घेऊन संस्था सभासदांच्या ठेवींची सुरक्षितता आणि पारदर्शक व्यवहार यांना सर्वोच्च प्राधान्य देते.

संस्थेचे कार्यालय शिवाजी रोड, जैताणे येथे असून परिसरातील महिला सभासदांना सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत.

📜 संस्था नोंदणी – दि. १४/०७/२०१४

दिनांक १४/०७/२०१४ रोजी संस्था नोंदणी प्रमाणपत्र देताना मा. श्री. आर. आर. पाटील साहेब – सहाय्यक निबंधक सहकारी संस्था साक्री, संस्थापक श्री. पंढरीनाथ सोनवणे, सह फाउंडर मेंबर श्री. कैलास भदाणे, श्री. राजू जगदाळे, श्री. नवल खैरनार, श्री. तुषार खैरनार!

नोंदणी क्र.
डी.एल.ई/एस.के.आय/आर.एस.आर/(सी.आर)१०२६/२०१४
नोंदणी दिनांक
१४ जुलै २०१४
नोंदणी अधिकारी
सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, साक्री
प्रेरणास्थान

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (१८३१–१८९७) यांनी स्त्री-शिक्षण, समानता आणि सामाजिक सुधारणांसाठी आयुष्यभर संघर्ष केला.

शिक्षणाने स्त्री सक्षम होते, तसेच आर्थिक स्वावलंबनाने ती कुटुंबाचा आणि समाजाचा आधार बनते – हाच विचार घेऊन संस्थेने त्यांचे नाव धारण केले आहे.

ब्रीदवाक्य : बचत – स्वावलंबन – विकास

संस्थापक

संस्थेचे शिल्पकार

संस्थापक श्री. पंढरीनाथ हरी सोनवणे
संस्थापक

श्री. पंढरीनाथ हरी सोनवणे

(एम.कॉम., जी.डी.सी.ए.)

ग्रामीण महिलांना हक्काची आर्थिक संस्था मिळावी या ध्येयाने श्री. पंढरीनाथ सोनवणे यांनी सहकाऱ्यांच्या साथीने संस्थेची स्थापना केली.

सह फाउंडर मेंबर

श्री. कैलास भदाणेश्री. राजू जगदाळेश्री. नवल खैरनारश्री. तुषार खैरनार
संचालक मंडळ

संचालक मंडळ – सन २०२४ ते २०२९

संस्थेचे कामकाज पाहणारे महिला संचालक मंडळ

१
सौ. तारा पंढरीनाथ सोनवणेचेअरपर्सन
२
सौ. संगिता कैलास भदाणेव्हा. चेअरपर्सन
३
सौ. सायंकाबाई हरी सोनवणेसंचालिका
४
सौ. रत्ना राजु जगदाळेसंचालिका
५
सौ. सुनिता नवल खैरनारसंचालिका
६
सौ. कल्पना बापु भलकारेसंचालिका
७
सौ. संगिता संजय खैरनारसंचालिका
८
सौ. शोभाबाई दौलत भदाणेसंचालिका
९
सौ. विमलबाई सखाराम अहिरेसंचालिका
१०
सौ. रेखा यादव भदाणेसंचालिका
११
सौ. राजबाई नंदु खैरनारसंचालिका
१२
सौ. ललीता वसंत बाविस्करसंचालिका
१३
सौ. आशा सुरेश सोनवणेसंचालिका
१४
सौ. शितल राजु सुर्यवंशीस्वि. संचालिका
१५
सौ. कल्पना संजय येवलेस्वि. संचालिका